वरकटणे येथे उद्या निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरती परिसंवाद शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन.
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभाग (आत्मा )सोलापूर व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड करमाळा यांच्या वतीने किसान गोष्टी कार्यक्रम अंतर्गत उद्या दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरती परिसंवादाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे व आत्माचे व्यवस्थापक अजयकुमार बागल यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ( आत्मा) चे श्री बाळासाहेब शिंदे हे प्रमुख उपस्थितीत राहणार असून कृषी संशोधन केंद्र जेऊरचे प्रभारी अधिकारी डॉ. विकास लोंढे , जैन इरिगेशन सिस्टीम चे केळी तज्ञ श्री किरण पाटील, ट्रायडेंट ऍग्रो कॉम प्रायव्हेट लिमिटेड मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक दिग्विजय राजपूत व राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर हे मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय वरकटणे येथे होणार असून या कार्यक्रमाचा लाभ वरकटने व पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा व प्रकल्प संचालक (आत्मा ) करमाळा व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
