राजुरीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना यांच्यावतीने विविध सामाजिक प्रबोधन उपक्रम राबविण्यात येणार -डाॅ.अमोल दुरंदे
राजुरी प्रतिनिधी सुखकर्ता… दुखहर्ता… दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग…सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,राजुरी येथे दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गणेश भक्तांच्या हस्ते करण्यात याप्रसंगी नवदांपत्य चेतन दुरंदे व सौं. शिवानी दुरंदे,पो.नि गुंजवटेसाहेब व पो.उ.नि कुंजीर साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सर्व ग्रामस्थ व गणेश भक्तामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजुरी यांच्यातर्फे विविध समाज प्रबोधन पर व पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये मूर्ती बनविणे स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन ,चित्रकला, स्पर्धा फनी गेम्स.व्याख्यान,गौरी गणपती सजावट स्पर्धा,आधार लिंक कॅम्प, वृक्षारोपण ,सत्संग संध्या,कॅरम व बुध्दीबळ स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा,नाटक स्पर्धा ,कथाकथन, एकांकीका स्पार्धा,रांगोळी स्पर्धा,अर्थवशीर्ष पठन इ. तसेच व्याख्यान मा. श्रीमंत कोकाटे (सर) विषय:- जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वारकरी ते शिवबांचे धारकरी व गौरी गणपती सजावट स्पर्धा किर्तनः ह. भ. प. सोनालीताई करपे (बीड), आर्ट ऑफ लिव्हिंग बार्शी शाखेचा सत्संग संध्या यामध्ये ॲड. सौं.वर्षा नानासाहेब साखरे इ. कार्यक्रमाचे आयोजन दि. १ ते ८ सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेले आहे.
३१ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढील सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते दिनांक निहाय गणपतीची आरती करण्यात येणार आहे.
गुंजवटे साहेब (पोलिस निरीक्षक )
कुंजीर साहेब ( पोलिस.उप.निरीक्षक )
मा.तानाजीबापू झोळ (युवानेते)
मा.सुमीत जाधव सो.(उप अभियंता MSEB करमाळा)
मा. निकम सो(MSEB पारेवाडी सबस्टेशन)
मा.रणजितसिंह नाईक निंबाळकर (खासदार, माढा लोकसभा)
मा. सवितादेवी राजेभोसले (जि.प. सदस्य)
मा. जयवंतराव जगताप(माजी आमदार)
मा. मनोजकुमार राऊत (गटविकास अधिकारी पं.स.)
मा. सौ. रश्मीदीदी बागल (शिवसेना नेत्या)
मा. सौ. स्वातीताई जाधव(पं.स. सदस्य )
मा. समीर माने सो(तहसिलदार)
तळेकर साहेब (मॅनेजर) बँक ऑफ इंडिया, कोर्टी व सर्व स्टाफ
मा. अनिरुद्ध कांबळे (मा. अध्यक्ष जि. प)
मा. अजित तळेकर(सरपंच, केम)
मा. संजयमामा शिंदे (आमदार, करमाळा)
मा. सुभाष (आबा) गुळवे (मा. उपाध्यक्ष जि.प.)
मा. नारायण (आबा) पाटील(माजी आमदार)
प्रा. रामदास झोळ (अध्यक्ष, दत्तकला शिक्षण संस्था)
मा.अतुल भाऊ पाटील (सभापती)
मा. यशवंत गायकवाड(R.P.I नेते) इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी परीक्षक ९८३४९२५१८४, ९४२१०४२४५१, ८२७५६०४०४९ तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धा व रांगोळी स्पर्धेसाठी महिलांनी या नंबरवर संपर्क साधावा. ९७३०३२०२०४, ९२८४९०८९९९ सर्व गणेश भक्तांनि कार्यक्रमाला उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांनी दिली.