ईगल लीप इंग्लिश मीडियम स्कूल करमाळा मध्ये नवरात्र निमित्त दांडिया नृत्य कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
विद्यानगर करमाळा येथील ईगल लीप स्कूलमध्ये दिनांक 02/10/22 रविवार रोजी नवरात्र महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांना सण, उत्सव, सांस्कृतिक वारसा याची माहिती व्हावी म्हणून स्कूलमध्ये मुलींचा गरबा, दांडिया नृत्य आदी कार्यक्रम घेतले. यामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षिका तसेच सर्व महिला पालक यांनी दांडिया गरबा नृत्यात सहभाग घेऊन उत्कृष्ट दांडीया नृत्य केले व या उपक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला तसेच प्रसादासाठी सर्व महिला पालकांनी खिरापत वाटली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश दिवेकर, उपाध्यक्ष विजय बागल ,मुख्याध्यापिका स्वप्नाली दिवेकर, विभाग प्रमुख सचिन पाटील, शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी तसेच सर्व महिला पालक उपस्थित होते.
