करमाळा

करमाळा भाजपाकडून सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

 

करमाळा प्रतिनिधी – भारतीय स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आज भाजपा संपर्क कार्यालय येथे साजरी करण्यात आली,
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी अभिवादन केले,
यावेळी बोलताना श्री.गणेश चिवटे म्हणाले की महिलांसाठीचे हक्क मिळविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोठे आहे, जाती – पातीरव आधारित लोकांवरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्याचे काम पूर्ण केले , पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली, महिलांसाठी शिक्षणाचे द्वार घडणाऱ्या अशा या महान ज्योतीक्रांती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे शेवटी गणेश चिवटे यांनी सांगितले.
यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, चेअरमन दासाबापू बरडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, चिकलठाणचे उपसरपंच दादासाहेब सरडे, नानासाहेब अनारसे, सागर सरडे, नितीन सरडे, काशिनाथ होगले, नितीन चोपडे, संजय किरवे ,विशाल घाडगे, विशाल साळुंखे, शरद कोकीळ आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित ,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group