करमाळासकारात्मकसामाजिक

टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी- अमित ठाकरे

करमाळा प्रतिनिधी सामाजिक कार्याचा वसा जपत टायगर ग्रुप ने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात नावलौकिक मिळवला असून टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा राहील असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमित ठाकरे साहेब यांनी व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की टायगर ग्रुप चे कार्य सामाजिक संघटनेची चळवळ युट्युबवर बघत असतो टायगर ग्रुप च्या माध्यमातून कोरोना काळामध्ये हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचे काम टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव व त्यांचे कार्यकर्ते यांनी केले असून कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या कार्याच्या जोरावर संपूर्ण देशभर युवकाच्या मनातील ताईत बनलेले टायगर ग्रुप चे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमित ठाकरे साहेब यांची सदिच्छा भेट टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव करमाळा मनसे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे,यांनी घेतली त्यावेळी अमित ठाकरे यांनी .टायगर ग्रुप व तानाजी भाऊ जाधव यांच्या कार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त त्यांच्या कार्यास व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आपण राजकीय पक्षांमध्ये का प्रवेश करत नाही असा सवाल आम्ही अमित ठाकरे यांनी केल्यानंतर तानाजी भाऊ जाधव म्हणाले की मी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत असून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्य करत राहणार हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे सांगितले. यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group