छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देवळाली येथे साजरी
करमाळा प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देवळाली येथे साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मा सभापती गहिनीनाथ आप्पा ननवरे व सतिश बापू कानगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे, सुधीर आवटे, नानासाहेब मोरे , आणा शिंगाडे, बापू कानगुडे,बाळू शिंदे, गोरख पवार, लखन शिंदे सचिन नलवडे आदी ग्रामस्थ तसेच युवक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन राहुल कानगुडे व सुधीर आवटे मिञ परिवार तर्फे करण्यात आले.
