करमाळा शहरामध्ये कायदा सुव्यवस्था पालन करण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता मार्च संप्पन
*
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये कायदा सुव्यवस्था पालन करण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शांतता मार्च संप्पन झाला.करममाळा शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचे यशस्वी पालन करण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहुन शहरामध्ये शांतता राहावी याकरिता पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहरातील मेन रोड ते महात्मा गांधी चौक याप्रमुख मार्गावरून बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पोलिसांचा मार्च काढण्यात आला. मुलींची छेडछाड बंद व्हावी रोड रोमियोना शासन व्हावे रात्री अपरात्री चोरी ,गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे व बेकायदेशीर वाहनाची तपासणी करुन कायदा व्यवस्था राखण्याकरिता करमाळा शहरातून मार्च काढण्यात आला आहे. या मार्चमध्ये साहेब पीएसआय मदने साहेब यांनी सहभागी होऊन करमाळा शहरामध्ये शांतता मार्च द्वारे नागरिकांना दक्ष राहून गुन्हेगारी कमी करण्यासाठी व निर्भय जीवन जगण्यासाठी दक्ष राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


