आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्यामुळे वाशिंबे गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्यामुळे वाशिंबे गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. याचे उद्घाटन
माऊली महाराज झोळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच तानाजी झोळ,उपसरपंच अमोल पवार,दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ, कल्याणराव शिंदे भैय्या झोळ, डॉ संजय साळुंखे, जगन्नाथ जगदाळे,अमोल भोंग, राहुल शिंदे,धोंडीराम कळसाईत,राजाभाऊ जगदाळे, सुधीर खाटमोडे,बाळासाहेब वाघमोडे,रवींद्र वाघमोडे, तुकाराम डोंबाळे,महादेव झोळ,संतोष झोळ, शुभम झोळ,कॉन्ट्रॅक्टर घाडगे पाटील,अनिल पाटील, ग्रामसेवक येडे आदिजण उपस्थित होते.
…..
चौकट
आमदार संजयमामा शिंदे यांच्या निधीतून गावातील वाशिंबे ते राजुरी रस्त्यासाठी साडेचार कोट रूपये मिळाले होते रस्ता पुर्ण झाला आहे. महादेव मंदिर सभामंडप पुर्ण झाले यासाठी दहा लाख रुपये, भैरवनाथ मंदिराचे सभा मंडप पुर्ण झाले यासाठी सात लाख,गावातील शाळेची दुरूस्तीसाठी चाळीस लाख रूपये अंतिम टप्प्यात आहे आदि विकासाचे कामे पुर्ण होत आहे – तानाजी झोळ सरपंच वाशिंबे, ता.करमाळा
