पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राजुरीत अभिवादन* : *सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान
राजुरी प्रतिनिधी राजुरी ग्रामपंचायत कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत गट /ग्रामपंचायत क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये डॉ. विद्या अमोल दुरंदे आणि पुनम नारायण नवगीरे यांचा अनुक्रमे
महिला सक्षमीकरण, महिलांचे आरोग्य, महिला बचत गटांचे संघटन, साक्षरता, रक्तदान शिबिराचे आयोजन आदी गोष्टीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी भारत भरातील असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार तर केलाच परंतु त्यांनी अनिष्ट प्रथा, परंपरांना विरोध करत अंधश्रद्धा निवारण्यासाठी केलेले कार्य यावेळी अधोरेखित केले. प्रसंगी राजुरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ.अमोल दुरंदे, प्रशासक देविदास सारंगकर, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, भानुदास साखरे, नंदकुमार जगताप, नवनाथ दुरंदे, गणेश जाधव, राजेंद्र भोसले, श्रीकांत साखरे,बंडू टापरे, लोखंडे काका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
