Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

अखिल भारतीय काँग्रेस आय कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी मोरवड गावचे छगन मोहोळकर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस आय कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी मोरवड गावचे छगन मोहोळकर यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली नारायण आबा पाटील गटाला राम राम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मोरवड गावामध्ये युवक कार्यकर्ता म्हणून छगन मोहोळकर यांचे काम चांगले असून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे त्यांचे संघटन कौशल्य बघून प्रतापराव जगताप यांनी काँग्रेस आय तालुका उपाध्यक्षपदी त्यांची निवड पत्राद्वारे केली आहे निवडीनंतर त्यांचा पुष्पगुच्छ हार चाल फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या निवडीनंतर छगन मोहोळकर म्हणाले की आपल्याला लहानपणापासुनच सामाजिक कार्याची आवड असून समाजकारणातून लोक कल्याणासाठी राजकारण करणे हे काळाची गरज असल्याने आपण त्यागाची व समर्पणाची भावना असलेल्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली गाव तेथे काँग्रेसची शाखा घर तेथे काँग्रेस ची भावना उराशी बाळगून आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी युवक महिला सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुक्यामध्ये सक्षमपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष संभाजी शिंदे अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष जावेद भाई शेख तालुका उपाध्यक्ष दादासाहेब कुदळे काँग्रेस आय अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण तालुका उपाध्यक्ष अशोक घरबुडे काँग्रेस आय शहराध्यक्ष सुजय जगताप तालुका उपाध्यक्ष रमजान मुलाणी तालुका उपाध्यक्ष साहिल भाई सय्यद तालुका उपाध्यक्ष ओबीसी सेल इकबाल भाई शेख महादेव कुदळे अर्जुन मदने सुलतान शेख निलेश चव्हाण नितीन चोपडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नितीन चोपडे यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group