करमाळा

बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळ्यातील खेड्यापाड्यात कमळाचे वातावरण फुलले -गणेश चिवटे


करमाळा प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टीच्या बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळ्यातील खेड्यापाड्यात कमळाचे वातावरण फुलले असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भाजपा नेते जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे करमाळा तालुक्यात प्रत्येक गावोगाव बुथ समितीच्या बैठका घेत आहेत,त्यांच्या बुथ बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक गावोगाव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व भाजपाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे , त्यामुळे गावोगाव कमळ चिन्हाला पसंती मिळत आहे यामुळे मतदान करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे,श्री गणेश चिवटे यांच्या आजवर करमाळा तालुक्यातील 70 ते 80 गावात विविध ठिकाणी बैठका संपन्न झाल्या आहेत,यावेळी पुढे बोलताना चिवटे म्हणाले की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा तालुक्यात आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची विकास कामे केले आहेत व पुढेही ते रिटेवाडी , पोंधवडी चारी व मांगी तलावासारखे पाण्याचे प्रश्न मार्गी लावतील यासाठी त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील गावोगाव प्रचार करून त्यांना करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही शेवटी यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group