करमाळा

करमाळा विधानसभा क्षेत्रातील बोरगाव येथे प्रा..रामदास झोळ सर यांचे जल्लोषात स्वागत व्यावसायिक शिक्षण संकुल रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी या भागातील प्रश्नः सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – प्रा रामदास झोळसर

करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा क्षेत्रातील बोरगाव येथे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांच्या गाव भेट दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी जल्लोषात उस्फूर्तपणे स्वागत केले.यावेळी प्रा.झोळ सर यांनी गावकऱ्यांसोबत,युवकांसोबत विविध विषयांवर चर्चा करताना शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या करमाळ्यात व्यावसायिक शिक्षण संकुल उभा करणार असल्याचे नमूद केले तसेच पुढील काळामध्ये आरोग्याच्या दृष्टीने देखील मोठ काम उभा करण्याचे आश्वासन यावेळी सरांनी बोरगाव ग्रामस्थांना दिले. संगोबा-बोरगाव हा रस्ता पूर्णपणे खड्डे युक्त असल्याने त्याचा देखील पाठपुरावा येत्या काळामध्ये करणार असल्याचे सरांनी नमूद केले. तसेच युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या एमआयडीसीच्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने लक्ष घालणार असल्याचा विश्वास युवकांना दिला.*
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गणेश जी मंगवडे, डॉ.प्रा. सुरेश शिंदे महादेव ढवळे, संभाजी डवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राजेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमासाठी बाळासाहेब पाटील, श्रीराम भोगल, सुरेश शिंदे, विलास ननवरे, पांडुरंग ननवरे ,विष्णू मस्के, विलास पाटील ,सुधीर भोगल ,अजिनाथ घाडगे, चंद्रकांत शिंदे ,जयसिंग घाडगे ,आदेश भोगल, सिद्धेश्वर शिंदे ,विनोद शिंदे, निखिल शिंदे, विशाल पाटील ,विशाल गायकवाड, विजय पाटील ,अक्षय घाडगे, केशव ढवळे, तुकाराम गाडगे ,बालाजी घाडगे ,ऋषिकेश शिंदे ,सुरेश ढवळे ,संतोष गायकवाड ,अक्षय शिंदे, माऊली घाडगे, संभाजी डावले, अमोल डवले, ऋषिकेश डवले ,वृक्षराज डवले ,अनिल शिंदे, यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group