करमाळा

पारेवाडी रेल्वे स्थानक येथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या… दिग्विजय बागल यांनी घेतली विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट.

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी सोलापूर जिल्हा भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर येथे भेट प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.                                              यावेळी दिलेल्या निवेदनात बागल यांनी म्हटले आहे की मुंबई पुणे,दौंड,कुर्डुवाडी,सोलापूर,बार्शीऊस्मानाबाद येथे करमाळा तालुक्यातील नागरीकांना दवाखाना,कोर्ट कचेरीची कामे, शाळा,कॉलेज,खरेदी, चाकरमानी यांना जावे लागते.परंतू सध्या जेऊर व पारेवाडी स्टेशन वर ठरावीक गाड्या सोडल्या तर इतर गाड्यांना थांबा नाही.परिणामी करमाळा तालुक्यातील नागरीकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनानेहैदराबाद मुंबई गाडी क्रमांक 22732/22731 तसेच चेन्नई- मुंबई मेल ऐक्सप्रेस गाडी क्रमांक ( 22158/22157)या गाडीला पारेवाडी स्थानकावर वजेऊर स्थानकावर हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस १२१५८- १२१५७ व उद्यान एक्सप्रेस || १९३०९ – ११३०२ या एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा.अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group