Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा मधील सिद्धार्थ मंजुळे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड


करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा मधील इयत्ता 11वी सायन्स मधील विद्यार्थी सिद्धार्थ संतोष मंजुळे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली.
दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने एस.आर.पी.एफ. मैदान सोरेगाव सोलापूर येथे मैदानी स्पर्धेचे आयोजन केलं होतं. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सिद्धार्थ संतोष मंजुळे या खेळाडूने ॲथलेटिक स्पर्धेतील 100 मीटर धावणे व 200 मीटर धावणे या
खेळामध्ये सहभाग नोंदवून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याने त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणार आहे. या यशस्वी खेळाडूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.रामकुमार काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group