करमाळा तालुक्याचे जनतेचे मा.आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशंभू ट्रॅस्टचेवतीने खांबेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न.

करमाळा प्रतिनिधी जनतेचे आमदार मा.नारायण आबा पाटिल यांच्या वाढदिवसा निमित्त श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत खांबेवाडी गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील युवकांनी उस्फूर्त प्रतीसाद दिला.मा.श्री.नारायण आबा पाटिल यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्त 54 युवकांनी 54 बँगा चे संकलन करुन सामाजिक बांधिलकी जपली. या शिबिराला पै.पृथ्वीराज भैय्या पाटील व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी यांनी भेट दिली. तसेच प्रत्येक रक्तदात्यास श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांचेकडून 5 ली पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला. अक्षय रक्तपेढी सोलापूर यांनी रक्तसंकलन केले.
रक्तदात्यांना व गोर गरीब गरजूना श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत बॅग देण्यात येईल असे ट्रस्ट चे तालुका अध्यक्ष संजय सरडे यांनी सांगितले तसेच पै.पृथ्वीराज पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
” शिबिराचे आयोजन N P ग्रुप खांबेवाडी व ग्रामस्थ यांनी केले होते”.

