Monday, February 23, 2026
Latest:
करमाळा

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांना पितृशोक; वडील अंबादास भांडवलकर यांचे दुःखद निधन

करमाळा, प्रतिनिधी : श्री मकाई सहकारी साखर कारखानाचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांचे वडील अंबादास रामचंद्र भांडवलकर (वय ९६) यांचे शनिवारी (ता. २१) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने करमाळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
अंबादास भांडवलकर हे शांत, संयमी व कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक तसेच सहकार क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविला. वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीय, नातेवाईक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, चार सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भांडवलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!