Thursday, March 12, 2026
Latest:
करमाळा

एकलव्य आश्रमशाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ संचलित एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी आश्रमशाळेतील मुलांनी सादर केलेल्या कला गुणांनी उपस्थितांची वाहवा मिळविली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे संस्थापक रामकृष्ण माने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपगराध्यक्ष अतुल फंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी संस्थेचे प्रमुख प्रा. गणेश करे – पाटील, चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अभिमन्यू माने, डॉ. स्वाती जाधव, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, नगरसेवक रवि जाधव, तुकाराम इंदलकर, सचिन गायकवाड, नगरसेविका अश्विनी अब्दुले, स्वाती फंड, जोत्स्ना लुनिया, सुनीता ढाणे, चैताली सावंत, पूजा इंदलकर, लता घोलप, माजी नगरसेविका मंदाकिनी पवार, मुख्याध्यापिका माया भागवत, सुषमा खडके, जयश्री माने, सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार, उद्योजक नितिन दोशी, अखिल भारतीय ब्राम्हण संघाचे तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी, इंग्रजी भाषा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड, शिक्षक नेते किसन कांबळे, डॉ. संजयकुमार राजेघोरपडे, धनंजय काळे, गोरख पवार, बाळासाहेब शिंदे, संभाजी माने, शांताराम माने आदि मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई माने, युवा एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. संग्राम माने, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे, श्रेयस खडके, कृष्णा भागवत, प्रफुल्ल जाधव यांनी केले. याप्रसंगी डॉक्टरेट मिळाल्याबद्दल करे – पाटील आणि जाधव तर प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माने यांनी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्नेहसंमेलनासारखे उपक्रम महत्वाचे असतात. गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. अधिकारी राऊत यांनी समाजातील तळागाळातील घटकातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सावंत, करे-पाटील यांनी शाळेच्या वाटचालीचे कौतुक केले. करे – पाटील यांनी शाळेसाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

स्नेहसंमेलनात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गाण्यांच्या तालावर समूहनृत्ये सादर केली. तसेच नाटिका सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कलांना उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रास्ताविक स्वातीताई माने यांनी केले. आभार मुख्याध्यापक सांगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!