करमाळा

आई कमलाभवानी संस्थेकडून अध्यक्ष डॉ. रोहन पाटील यांच्या वतीने गॅस सिलेंडर स्फोटा मुळे हानी झालेल्या बाळू दामोदरे कुटुंबाला पाच हजारांची आर्थिक मदत

करमाळा प्रतिनिधी देवळाली येथील बाळू अनंता दामोदरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यांचे घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य नष्ट झाल्यामुळे दामोदरे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.
या घटनेची दखल घेत आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. रोहन पाटील यांनी पुढाकार घेत बाळू दामोदरे यांच्या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली. या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
समाजातील गरजू व आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे कार्य संस्थेकडून सातत्याने केले जात असून, अशा वेळी समाजानेही पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रोहन पाटील, सचिव डॉ. शिवानी पाटील, तसेच अभिजीत पाटील, अजिंक्य पाटील, तात्यासाहेब जाधव, पत्रकार प्रफुल्ल दामोदरे महादेव भोसले आणि प्रमोद जगदाळे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!