संगोबा ते घारगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्त्याची झाली दुरावस्था रस्ता दुरुस्ती करण्याची सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे यांची मागणी
संगोबा ते घारगाव पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे नागरिकांना शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता मराठवाड्याला जोडला गेलेला आहे या रस्त्यावरून सारखी रहदारी चालू आहे नाहक सर्वांना याचा त्रास होत आहे सदरचा रस्ता मराठवाड्यातील परांडा भूम धाराशिव ला जोडणारा आहे सदर रस्त्यावर मराठवाड्यात जाणाऱ्या वाहनांची बऱ्यापैकी ये जा होत असते तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी खड्डे बुजवावेत या अगोदर देखील निवेदन दिलेले आहे असे घारगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सरवदे यांनी सांगितले आहे.
