करमाळा वकील संघाकडून माजी उपाध्यक्ष ॲड. अजित विघ्ने यांचा सत्कार…
करमाळा प्रतिनिधी
करमाळा वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ॲड. अजितराव विघ्ने यांना नुकताच सकाळ वृत्त पत्र समुहाकडुन *सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र* पुरस्कार प्राप्त झाला.. त्याबद्दल करमाळा वकील संघाकडुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.. याप्रसंगी ज्येष्ठ व ज्युनिअर वकील मंडळी कडुन त्यांचे सामाजिक, राजकीय, वकीली क्षेत्रातील कामाबद्दल आणि त्यांचे चिकाटी बद्दल कौतुक करण्यात आले.. याप्रसंगी ॲड. बाबुराव हिरडे, ॲड. कमलाकर वीर, ॲड. राहुल सावंत, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. महादेव कांबळे, विद्यमान अध्यक्ष अँड. विकास जरांडे यांची भाषणे झाली.. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ एन डी रोकडे, एस. पी रोकडे, बी टी देवी, अॅड सौ. लता पाटील, यांचे सह सर्व वकील मंडळी उपस्थित होते.. आभार प्रदर्शन सचिव अँड. योगेश शिंपी यांनी केले..
