राजेभोसलेंची वकीली आमदार संजयमामा शिंदेच्या कार्यकर्त्याकडे?
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान जोरात चालु असुन, आज ऊमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रीया पार पडली. यावेळी आपआपले गटाकडुन हरकती घेण्यासाठी आणि छाननी करीता वकीलांची फौज उभी करण्यात आली होती.. छाननी प्रक्रीयेत जिंती येथील एका जागेबाबत ॲड. नितीनराजे राजेभोसले यांनी हरकत घेतली असुन या हरकतीला उत्तर देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. सवितादेवी राजेभोसले यांचेवतीने आमदार सजयमामा शिंदे गटाचे समर्थक ॲड अजित विघ्ने यांना वकील म्हणुन नेमण्यात आले होते. दोन्ही बाजुने चढाओढीने युक्तीवाद करण्यात आला असुन, यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांचा कार्यकर्ता राजेभोसले यांची वकीली करताना दिसल्यामुळे याची सर्वत्र चर्चा रंगली आहे
चौकट- याबाबत आम्ही ॲड. अजित विघ्ने यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही जिंती ग्रामपंचायतीची निवडणुक असुन, संबधित उमेदवारांचा वकील म्हणुन मी त्या ठिकाणी काम केले हे वास्तव आहे. राजकीय कार्यकर्ता आणि वकीली या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असुन, कोणी गैरसमज करून घेऊ नये आणि तालुक्यातला कोणताही गट मामांच्या पाठीशी राहु शकतो.. ग्रामपंचायतीचे राजकारणात स्थानिक सर्वच गट एकत्रित असतात..
