Monday, April 21, 2025
Latest:
Uncategorized

एक वर्ष शेतात राब राब राबलो*अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो! *डॉ.तानाजीराव सावंतांनी मन मोकळे करताना मांडला संघर्षमय जीवनाचा पट*

मुंबई,दि.- ” गरीबीमुळे तब्बल एक वर्ष शेतात पडेल ते काम केले.राब राब राबलो.त्यानंतरच्या काळात कराडला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला! संघर्ष माझ्या रक्तात आहे.त्यामुळेच सात आठ सहकाऱ्यांना घेऊन निष्ठेने सुरू केलेला शिक्षण क्षेत्रातला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला गुणवत्ता आणि गरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न मला लगेच समजतात ते कोणी समजावून सांगण्याची गरजच नाही!”,या भावना आहेत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जे.एस.पी.एम.) परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळविणारे शिक्षणतज्ज्ञ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बिणीचे शिलेदार आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या!
आपल्या आक्रमक राजकीय शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे डॉ.तानाजीराव सावंत यांचे संवेदनशील आणि सामाजिक जाणीवेचे वेगळेच रुप मंत्रालयात त्यांच्या दालनात रंगलेल्या गप्पांमध्ये अनुभवायला मिळाले.शिक्षण क्षेत्रात ” विद्यार्थी पालक” सारख्या अनेक प्रयोगांचे दाखले देताना गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी व त्यांच्या निष्ठावान टीमने केलेल्या परिश्रमाची माहिती त्यांनी दिली.राजकीय वाटचालीतील अनेक रंजक घडामोडींचे किस्से सांगतानाच स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांनी भारतीय विद्यापीठातील प्राध्यापकपदाची नोकरी चक्क रेल्वे स्टेशनवर कशी दिली,यांची आठवणही सांगायला ते विसरले नाहीत.
या गप्पा सुरु असतानाच महाराष्ट्राला कोरोना संकटातून बाहेर काढण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणारे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दालनात दाखल झाले.हीच संधी घेऊन संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी त्यांचे “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे पुस्तक राजेश टोपे यांच्या हस्ते आरोग्यमंत्री डॉ.साव़ंत यांना भेट दिले.या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य व ख्यातनाम संपादक पत्रकार राजेंद्र हुंजे, महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनचे संपादक अभिजीत कांबळे हेही उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group