बी.फार्मसी प्रवेशासाठी नीट च्या विद्यार्थ्याना १५% जागा -प्रा.रामदास झोळ
भिगवण प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश नोंदणी प्रक्रिया दि.२८.०९.२०२२ पासून सुरू झालेली आहे,ही प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्या मार्फत सुरू करण्यात आली आहे.
या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देत असताना असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन् एडेड इन्स्टिट्युट इन रुरल एरिया चे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी सांगितले की, प्रथम वर्ष पदवी औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्मसी) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५% जागा राखीव ठेवलेल्या असतात.तरी जे विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र नसतील,अश्या विद्यार्थ्यानी प्रथम वर्ष पदवी औषधनिर्माण शास्त्र (बी.फार्मसी) प्रवेशासाठी अर्ज करावा,ह्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही २८.०९.२०२२ ते ०३.१०.२०२२ पर्यंत आहे,तरी या बाबत सर्वांनी लाभ घ्यावा.तसेच,ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली नसेल व नीट परीक्षा दिली असेल,अश्या विद्यार्थ्यानी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा व अधिक माहितीसाठी सीईटी सेल च्या www.cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी,असे सांगितले आहे.
