पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी-लक्ष्मीकांत पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केत्तुर नं १,केत्तुर नं २,पारेवाडी, दिवेगव्हाण,गोयेगाव, पोमलवाडी, हिंगणी, खातगाव, जिंती, टाकळी, रामवाडी,कावळवाडी,वाशिंबे, उंदरगाव, मांजरगाव, कोर्टी, सावडी,देलवडी,घरत वाडी, कुंभारगाव, इत्यादी गावात मोठ्या स्वरूपात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून केळी,डाळिंब,कांदा, मका, बाजरी, सोयाबीन, उडीद, सुर्यफुल,वांगी,टोमँटो,भाजीपाला या पिकांचे अतोनात न भरून येणारे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुरदंड सोसावा लागत आहे . सातत्याने रोजची रोज होत असलेल्या पावसामुळे पुढील हंगाम सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून निघून चाललेला आहे. तसेच ऊस तोडणी साठी आलेल्या ऊसतोड कामगारांची सुद्धा हाल होत आहेत.पाऊसाने रस्ते वाहून गेल्यामुळे ऊस तोड हंगाम ही लांबणीवर जात आहे. अतिरिक्त पावसाने झालेल्या नुकसानामुळे प्रशासनाने त्वरीत पंचनामे करावेत अशी मागणी युवा कार्यकर्ते लक्ष्मीकांत पाटील यांनी सोलापूर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील यांचे कडे निवेदनाद्वारे केले आहे.
