श्री मकाईचा ऊस दर जाहीर;२०२२- २३ या गाळप हंगामात २५०१ रुपये अंतिम दर दिला जाणार – चेअरमन दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला आहे. यावर्षी म्हणजे २०२२- २३ या गाळप हंगामात २५०१ रुपये अंतिम दर दिला जाणार आहे असे मत मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले आहे. ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व सर्व संबंधितांनी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहकार्य करून कामाला लागावे.
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय प्रिन्स बागल यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूकदारांची बैठक संप्पन झाली.या बैठकीस संचालक बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके,बापु कदम, कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, शेतकी अधिकारी शिवाजी कदम आदीजण उपस्थित होते. यावेळी वाहतूकदारांनी अनेक प्रश्न केले. कारखान्याचे काही अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. तेव्हा बागल यांनी ऊस दर जाहीर केला आहे. या गाळप हंगामात ऊसाचा अंतिम दर २५०१ असणार आहे. त्यामध्ये पहिला हप्ता २३०१, दुसरा १०० व अंतिम १०० असा २५०१ दर दिला जाणार आहे.करमाळा तालुकयातील मकाईने यावर्षी पहिल्यांदाच दर जाहीर केला आहे. आता इतर कारखाने काय दर जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
