पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी साधला अनोपचारिक संवाद.
*पुणे प्रतिनिधी:* येथील पुणे हिंदू जिमखाना येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. राजकीय, सामाजिक, तसेच पुण्याच्या विकासाशी निगडित अनेक प्रश्नांवर अनौपचारिक चर्चा भलतीच रंगली. पत्रकारांनीही पाटील यांच्या दिलखुलास स्वभावाला चांगलीच दाद दिली.
यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
*डिजिटल पत्रकार संघटनेच्या पुण्यातील पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला तसेच डिजिटल मीडिया पत्रकार संघाची ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली निश्चितच चांगली वाटचाल होईल या विषयी शंका नसल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच राजा माने यांच्याशी या विषयावर चर्चा होतं असून शासन पत्रकारांच्या समस्यांसाठी निश्चित काम करेल असेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले.* पुणे जिल्ह्यातील तसेच शहरातील अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.
