माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर शाळा,एकलव्य आश्रम शाळेत अन्नदान
करमाळा- माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वैभवराजे जगताप मित्रमंडळाच्या वतीने देवीचा माळ येथील मुकबधीर विद्यालय, तसेच एकलव्य आश्रम शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांना जेवण वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष वैभवराजे जगताप म्हणाले कि,माझे आजोबा कै.नामदेवराव जगताप यांच्यापासून जनसेवेची परंपरा चालू असून माझे वडील जयवंतराव जगताप साहेब यांनी ती परंपरा पुढे टिकवून ठेवली आहे.मी देखील त्याच विचारांनुसार काम करत आहे.आज माझे वडील जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना अन्नदान करुन हा आनंदाचा दिवस साजरा करत आहोत.
यावेळी मूकबधिर विद्यालय येथे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.एकलव्य आश्रम शाळेत किशोर शिंदे ,सचिन अब्दुले यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक अशोक सांगळे यांनी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे स्वागत केले.यावेळी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,बाळासाहेब बलदोटा,जोतिराम ढाणे,बाळासाहेब कांबळे,बबलू कुकडे,गणेश कुकडे,तानाजी कुकडे,संतोष कारंडे,बाळू दुधाट यांच्यासह वैभवराजे जगताप मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
