स्व. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्याचा वसा जपणारे सचिन मालक गायकवाड २ फेब्रुवारी वाढदिवस विशेष
करमाळा शहर व तालुक्यामध्ये स्वर्गीय बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा जपणारे तसेच युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सचिन मालक गायकवाड यांचा वाढदिवस 2 फेब्रुवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळेतील मुलांना खाऊ वाटप वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप तसेच जेष्ठ नागरिकांना अन्नदान करून त्यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे सचिन गायकवाड यांनी स्वर्गीय बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले असून कोरोना काळातही रुग्णांना मदत करण्यासाठी भव्य असे रक्तदान शिबिर घेऊन करमाळा शहरातील मंडळांना रक्तदान करण्यास प्रवृत्ती केली होत याचबरोबर मास्क सॅनिटायझर वाटप गरीब कुटुंबांना किराणा मालाची वाटप तसेच पर प्रांतावर जगण्यास आलेल्या मजुरांना परत त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांनी मदत केली असून अनेक संकटात असणाऱ्या कुटुंबांना नवजीवन देण्याचे काम त्यांनी केले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये फार झालेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या कुटुंबाला तात्काळ मदत मिळवुन देण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वतःचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता समाजात काम करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस महापुरुषांच्या फ्रेमा भेट देऊध साजरा केला आहे.माणुसकीची भिंत,रोज वाढदिवसाची पोस्ट याचबरोबर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असून सरकार मित्र मंडळ हे करमाळा शहर व तालुक्यामध्ये सर्वाधिक गर्दी खेळणारी मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे या मंडळाचे हि प्रभावीपणे काम करीत आहेत. उन्हाळ्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणपोई मुक्या जनावरांसाठी चारा वाटप पाणी पोई असे उपक्रम याचबरोबर सकल मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्यरत असून शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो जाती धर्माच्या लोकांशी जिव्हाळयाचे व माणुसकीचे नाते निर्माण केले असून रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे नियोजन ते करत असतात त्याचबरोबर नवरात्र उत्सव असो दिवाळी असो कुठलाही सण असो हे सण ते सर्वांना बरोबर घेऊन साजरे करतात लोकांच्या अडीअडचणीला तात्काळ मदतीला जाऊन त्या माणसाची मदत करणे हे सचिन गायकवाड यांच्या स्वभाव गुण असल्याने युवकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक विशेष आदर व प्रेम आहे सचिन मालक या नावाने ते परिचित असून आपल्या कार्याच्या जोरावर वेगवेगळ्या गटातील व राजकीय पक्षातील मित्रपरिवारांचा मोठा परिवार आहे.निरपेक्ष व निस्वार्थ भावनेने समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन ते यशस्वीपणे सामाजिक कार्यात यशस्वीपणे वाटचाल करीत आहे त्यांना मिळणारा समाजाकडुन पाठींबा व प्रेम हे त्यांच्या कामाची पावती आहे.समाजाच्या विविध प्रश्नासाठी प्रसंगी आंदोंलन करून प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. त्यांनी समाजसेवेचा घेतलेला वसा सामाजिक कार्यात मिळत असलेला पांठिबा हे पाहता त्यांचे भविष्य उज्वल आहे.सचिन मालक यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा
