यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.१९ फेब्रुवारी रोजी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय श्री .विलासरावजी घुमरे ( सर ) यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्ति स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला . याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड सर , महावियालयाचे प्राचार्य डॉ .एल.बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ . अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एन .सी.सी. कॅडेट उपस्थित होते .
