करमाळाताज्या घडामोडी

करमाळ्यात शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांना विधानपरिषदेवर घ्यावे – प्रियांका गायकवाड, शिवसेना महिला तालुका प्रमुख करमाळा

करमाळा प्रतिनिधी –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांना झालेल्या पितृशोकानिमित्त त्यांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री मा . ना . श्री . शंभूराजे देसाई करमाळा येथे नियोजित दौरा होता. सदर दौऱ्या दरम्यान त्यांनी करमाळा येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीनंतर करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी नारायण पाटील यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेणेबाबतचे निवेदन मंत्री शंभुराजे देसाई यांना दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, करमाळा माढा विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी संपूर्ण करमाळा तालुका हा शिवसेनामय करून भगवा केलेला आहे . नारायण पाटील हे आमदार असताना इतिहासात पहिल्यांना पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे . तसेच करमाळा तालुक्याच्या इतिहासात आजवर न झालेली विकास कामे मा.नारायण आबा यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत पूर्ण करून दाखविली आहेत . परंतु नुकत्याच झालेल्या करमाळा – माढा विधानसभा निवडणूकीवेळी काही असंतोषी लोकांमुळे करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार मा.नारायण पाटील यांना ऐनवेळी शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही . पक्षाप्रति प्रेम व आदर असतानाही त्यांना जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवावी लागली . निवडणूक प्रचारावेळी नारायण आबा पाटील हे सदैव हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे , शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांचे बद्दल आदर व्यक्तं करून भाषणाची सुरूवात करायचे त्यांचे पक्षाप्रति असलेल्या निष्ठेमुळे तमाम शिवसैनिक हे आबांसोबत उभे राहिले होते . सदर विधानसभा निवडणूकीमध्ये ते अवघ्या तीन ते चार हजार मतांनी पराभूत झाले . हेच जर शिवसेना पक्षाची उमेदवारी नारायण पाटील यांना मिळाली असती तर आज करमाळा तालुक्याचा आमदार हा शिवसेना पक्षाचा असला असता . याची खंत सर्व शिवसैनिकांना व तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला वाटत आहे .
विधानसभा निवडणूक होताच जिल्हा परिषदेची निवडणूक लागली असता त्यांनी जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य मा.श्री . अनिरूध्द कांबळे यांना अध्यक्ष करीत जिल्हापरिषदेवर शिवसेना पक्षाचे वर्चस्व निर्माण केलेले आहे . मा . नारायण आबांनी जिल्हा परिषद , पंचायत समिती , कृषि उत्पन्न बाजार समिती , नगरपरिषद , ग्रामपंचायत इत्यादी सर्व निवडणूका ह्या स्वतःच्या गटावर न लढविता शिवसेना या चिन्हावर लढविल्या असून जवळपास सर्व स्तरात त्यांना यश प्राप्त झालेले आहे . मागील विधानसभा निवडणूकीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेनाचा एकमेव आमदार म्हणून नारायण आबा पाटील हेच होते . आजही सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची ताकत वाढविणेसाठी नारायण आबा पाटील यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती केल्यास सर्व शिवसैनिकांत चैतन्याचे वातावरण निर्माण होईल . आज करमाळा तालुक्यातील शिवसैनिकांना एका खंबीर अशा नेतृत्वाची गरज असून ते नेतृत्व फक्त नारायण आबा पाटील यांच्यामध्येच आहे . तरी आम्ही शिवसैनिक या नात्याने आपणांस विनंती करतो की , आपण मा . नारायण आबा पाटील यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी देवून करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचा झंझावात चालू राहण्यासाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रिंयका गायकवाड यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group