विद्यार्थ्यांविना शाळा सुन्यासुन्याच व शाळेचे मैदानही पडली ओस.

केत्तुर प्रतिनिधी -सचिन खराडे सध्या कोरोनाच्या विषाणूच्या महाभयंकर संकटामुळे महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शाळा बंद आहेत. त्यामुळे या सर्वच शाळा सुन्यासुन्या पडल्या आहेत .शाळेचे मैदान ही ओस पडल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी 15 जूनच्या आसपास या शाळा भरत असत परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटामुळे गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत.नुकताच इयत्ता बारावीचा निकाल लागलेला आहे परंतु इयत्ता दहावीचा निकाल अजूनही लागलेला नाही.
शाळानेमक्या कधी चालू होतील हा मोठा प्रश्न पालकांपुढे आणि विद्यार्थ्यांपुढे भेडसावत आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचा आग्रह धरला होता. आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणही सुरू झाले आहे. परंतु या ऑनलाईन शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची दाट शक्यता आहे.ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पुस्तके ज्ञानाची भर घातली जाईल परंतु विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि कसरती खेळांचे काय हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.सध्या स्वातंत्र्यदिन नजदीक आलेला असताना मैदानात भरवल्या जाणाऱ्या कवायती आणि मैदानात खेळणारी खो-खो, कबड्डी आणि इतर खेळ हे पूर्णतः बंद असल्याने सर्व शाळांची मैदाने ओस पडल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. कोट करणे-जोपर्यंत कोरोना पूर्णपणे जात नाही तोपर्यंत कमीत कमी प्राथमिक शाळा तरी सुरू करू नयेत कारण ज्या ठिकाणी शहाण्या माणसांना सोशल डिस्टन्स इन चे पालन करणे जमत नाही त्या ठिकाणी लहान मुले सोशल डिस्टंसिंग चा कसा वापर करतील -. महावीर राऊत पालक
