सह्याद्री भूषण पुरस्कार डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना प्रदान
मुंबई:-तामिळनाडु राज्यात चेन्नई नजिक छत्रपती शिवरायांच्या जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी आदर्श गाव योजनेचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दैनिक नवशक्ति व फ्री प्रेस जर्नलचे समूह राजकीय संपादक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार ख्यातनाम शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखालील हिंदवी परिवार या राष्ट्रसेवा संस्थेच्यावतीने बहाल करण्यात आला.यावेळी आयुर्वेदाचार्य डॉ रामदास आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
*हिंदवी परिवाराच्या ३०० शिवभक्तांनी पुर्ण केली दक्षिण दिग्विजय मोहीम*
——————-
https://www.youtube.com/watch?v=9RziBNt5ERo