करमाळ्यात ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिल रोजी भव्य नागरी सत्कार श्री स्वामी समर्थ स्मारकाचे लोकार्पण
करमाळा : प्रतिनिधी
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार श्री. नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. मनाहेरपंत चिवटे यांच्या स्मरणार्थ करमाळा येथे भव्य जाहीर नागरी सत्कार व “श्री स्वामी समर्थ महाराज स्मारक” लोकार्पण सोहळा रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील श्री तुळशी वृंदावन शेजारी, श्री कमलादेवी रोड येथे होणाऱ्या या सोहळ्यामुळे करमाळा शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते श्री. शशिकांतजी जाधव हे राहणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना संपर्कप्रमुख श्री. पै. चंद्रहारजी पाटील माढा माजी मंत्री तथा माजी आमदार .ना. श्री. सिध्दरामजी म्हेत्रे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र समितीचे संस्थापक अध्यक्ष . श्री. जन्मेजयराजे भोसले, वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष . श्री. महेशजी इंगळे, तसेच कार्यकारी अध्यक्ष श्री. अमोलराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ज्ञानसाधना शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. किरणजी सोनटक्के सर युवासेना मराठवाडा सचिव मा. श्री. बाजीरावजी चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाप्रमुख मा. श्री. आनंदजी भरोसे परभणी, नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई सावंत करमाळा, तसेच श्री स्वामी समर्थ भक्त प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याचे निमंत्रक मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.


