Wednesday, May 13, 2026
Latest:
Uncategorized

उद्‌घाटनाचे सोहळे कुणीही करा-यापुढे मिरवणुका मात्र माजी आमदार. संजयमामांच्या निघतील.. विकासकामे कुणी आणली हे जनतेला सांगण्याची गरज नाही- ॲड.अजित विघ्ने प्रवक्ते उपसभापती पं.स. करमाळा

करमाळा  प्रतिनिधी ९/५/२६ रोजी करमाळा तालुक्यातील रावगाव येथील नवीन३३/११ केव्ही महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या सब स्टेशनचे उद्-घाटन अतिशय घाईघाईने झाले. वस्तुतः प्रोटोकॉल प्रमाणे विद्यमान आमदार. नारायण पाटील यांनी जरी उद्-घाटन केले असले तरी सदर रावगाव सबस्टेशन चे मंजुरीचे काम माजी आमदार. संजयमामा शिंदे यांचे कार्यकाळातले आहे हे सर्वश्रुत आहे. माजी आमदार. संजयमामा शिंदे यांचे कार्यकाळातील मंजुर रावगाव सबस्टेशन पुर्ण झालेमुळे याबद्दल माजी आमदार संजयमामांचा हृदय सत्कार समारंभ रावगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ९/५/२६ शुक्रवार रोजी सायंकाळी आयोजित केलेला होता. मात्र या बाबतची बातमी कळताच एमईएसबी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच आमदार. नारायण आबा पाटील यांचे हस्ते सकाळी ९ वाजता रावगाव सब स्टेशनचे उद्-घाटन करण्यात आले. विशेषतः या सबस्टेशनच्या मंजुरी बाबत विद्यमान आमदारांनी मिडीयासमोर स्टेटमेंटही केले. त्यामुळे माजी आमदार. संजयमामा शिंदे गटातर्फेही पत्र व्यवहार, मंजुरीची पत्रे प्रसिध्द करण्यात आली. राजकारणामधे ही स्पर्धा चालूच रहाते मात्र ज्यांनी हे काम केलयं त्यांचे क्रेडीट मोठ्या मनाने लोकप्रतिनिधी यांनी ज्याला त्याला दिले पाहिजेत व विकासकामांची स्पर्धा केली पाहिजे. मात्र करमाळा तालुक्यात मात्र विकासकामांना खिळ कशी घालायची.. आणि दुसऱ्याच्या कामाचे श्रेय आपण कसे लाटायचे याचीच स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधी हे एखादया प्रोजेक्ट विषयी, संकल्पित कामांबाबतही चुकीची माहिती देतात. व त्यांचे कार्यकर्ते तशाच पद्धतीने पसरवित राहतात यामुळे करमाळा तालुक्यातील विकासाच्या मुद्द्यांपासून कोसो दूर जात आहे. आज करमाळा तालुक्यातील सहकाराची खरी परिस्थिती काय आहे?.. करमाळा तालुक्यात चालु दोन वर्षात किती निधी मंजुर झाला आहे? याबाबत कोणीही अवाक्षर बोलत नाहीत मात्र ज्याने विकासाला गती देण्याचे काम केले त्यांचे कामाचे श्रेय घेण्याची चढा-ओढ करायची. हे चुकीचे असले बाबतचे मत राष्ट्रवादी काँग्रेस( अजितदादा पवार गट) प्रवक्ते व करमाळा पंचायत समितीचे उपसभापती अँड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी पुढे बोलताना असे स्पष्ट केले की माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मंजुर करून आणलेली कोट्यावधीची विकासकामे तालुक्यात सर्वत्र चालू असुन.. यापुढे विकासकामांचे उद्-घाटन कुणीही करीन मात्र याकरीता मिरवणुका पात्र माजी आमदार. संजयमामांच्या निघतील असा विश्वास ॲड अजित विघ्ने यांनी व्यक्त केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!