करमाळा

करमाळ्यात ‘देऊळ बंद २’ची धमाकेदार एन्ट्री; पिक्चर टॉकीजमध्ये २१ मेपासून प्रदर्शन सुरू-निखील चांदगुडे

करमाळा, प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट आता करमाळ्यातील प्रेक्षकांच्या भेटीला आला असून शहरातील पिक्चर टॉकीज येथे गुरुवार दि. २१ मे २०२६ पासून चित्रपटाचे प्रदर्शन सुरू झाले आहे.अशी माहीती “पिक्चर टॉकीजचे मालक निखिल चांदगुडे यांनी दिली आहे.आता परीक्षा देवाची..” या दमदार टॅगलाईनमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपटाचे प्रदर्शन गुरुवार दि. २१ मे ते गुरुवार दि. २८ मे २०२६ या कालावधीत होणार असून करमाळा व परिसरातील चित्रपटप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. धार्मिक, सामाजिक आणि भावनिक कथानकाची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाकडे युवकांसह कुटुंबीयांचाही मोठा ओढा दिसून येत आहे.
चित्रपटाचे शो वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे. गुरुवार व शुक्रवार रोजी सायंकाळी ३.००, ७.०० व १०.१७ वाजता शो होणार आहेत. शनिवार व रविवार रोजी दुपारी ३.००, सायंकाळी ६.१९ व रात्री ९.३९ वाजता शो ठेवण्यात आले आहेत. तर सोमवार ते गुरुवार दरम्यान रात्री ९.१५ वाजताचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे.
ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी ‘बुक माय शो’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रेक्षकांना आगाऊ तिकीट आरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिक्चर टॉकीज हे थिएटर करमाळा येथील बायपास रोडवर, रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी स्थित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त थिएटर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!