Sunday, October 4, 2026
Latest:
Uncategorized

२१ ऑगस्टला पवार जनरल हॉस्पिटल करमाळा यांच्यावतीने मोफत ऑर्थोपेडिक व दंत चिकित्सा शिबिर

करमाळा प्रतिनिधी : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत ग्लोबल फाऊंडेशन संचलित पवार जनरल हॉस्पिटल, बस स्टँडजवळ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य ऑर्थोपेडिक व दंत चिकित्सा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पवार जनरल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रविकिरण पवार यांनी दिली आहे. या शिबिरामध्ये हाडे, सांधे, मणके, दात व हिरड्यांच्या विविध समस्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार असून तपासणीसोबतच औषधेही मोफत देण्यात येणार आहेत.
करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, मणक्यांचे विकार, फ्रॅक्चर तसेच दात व हिरड्यांच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे. अनेक नागरिक विविध कारणांमुळे या आजारांकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांसाठी हे शिबिर आरोग्य तपासणी व योग्य उपचाराचे मार्गदर्शन मिळविण्याची महत्त्वाची संधी ठरणार आहे.
या शिबिरामध्ये ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. पाटील विश्वजीत विजय यांच्या मार्गदर्शनाखाली गुडघा बदल शस्त्रक्रिया, खुबा बदल शस्त्रक्रिया, हात-पायांच्या दुखापती, फ्रॅक्चर, मणक्यांचे विकार तसेच इम्प्लांट व प्लेट काढण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. राहुल अविनाश राऊत यांच्याकडून हाडांचे विकार, फ्रॅक्चरचे निदान व उपचार, शस्त्रक्रिया, संधिवात, सांधेदुखी, हात-पायांना मुंग्या येणे, कंबरदुखी, सायटिका आणि मणक्यांशी संबंधित आजारांची तपासणी करून तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.
दंत चिकित्सा विभागात डॉ. राहुल श्वेता यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या दात व हिरड्यांची तपासणी करण्यात येणार आहे. रूट कॅनॉल उपचार, सिमेंटेशन, संपूर्ण कवळी बसवणे, वेडावाकडे दात सरळ करण्याबाबत मार्गदर्शन, दातांची स्वच्छता तसेच दात व हिरड्यांच्या विविध समस्यांवर तज्ज्ञांचा सल्ला दिला जाणार आहे. त्यामुळे दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनीही या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पवार जनरल हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी आधुनिक वैद्यकीय सुविधाही उपलब्ध आहेत. यामध्ये CT Scan, ऑटोमॅटिक पॅथॉलॉजी लॅब, सुसज्ज ICU, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, २४ तास आपत्कालीन सेवा, ४० बेडची सुसज्ज हॉस्पिटल सुविधा, डिजिटल X-Ray, अनुभवी डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आधुनिक निदान व उपचार सुविधा तसेच फिजिओथेरपी व पुनर्वसन सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत उपचारांची सुविधाही उपलब्ध असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
“एकाच छताखाली आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा करमाळा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पवार जनरल हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरासाठी अपॉइंटमेंट तसेच अधिक माहितीसाठी ९९५०२ ५७३७३ या क्रमांकावर संपर्क साधावा. आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याने २१ ऑगस्ट रोजी होणारे हे मोफत आरोग्य शिबिर नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!