श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा या वर्षीच्या हंगामातील पहिला ऊसाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा-दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी
श्री मकाई सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासद कामगार यांच्या मालकीचा कारखाना असुन आपले हित जपण्यासाठी व कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकरी सभासद या कारखान्याला ऊस घालून सहकार्य करत असुन आपला साखर कारखाना एफ आर पीप्रमाणे ऊसाला भाव देण्याचे काम करणार असल्याचे अभिवचन दिले होते याची वचनपूर्ती आपण करणार असून पहिला ऊसाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला असून सभासदांनी मकाई कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे असे आवाहन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय प्रिन्स बागल यांनी व्यक्त केले. श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने या हंगामातील पहिला ऊस हप्ता 2200 रुपयांनी जमा केला असून सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त पहिला हप्ता देणारा कारखाना मकाई ठरला आहे. यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री मकाई सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांच्या नेतृत्वाखाली श्री मकाई चांगला ऊसदर देण्यासाठी कटिबध्द असणार आहे .अनंत अडचणीवर मात करून ऊसाचे गाळप यशस्वीपणे चालू असुन शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी या ऊस दराबद्दल सर्व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून मकाई सहकारी साखर कारखान्याचे गाळप यशस्वीपणे होण्यासाठी कारखान्याचे सर्व कर्मचारी व्हा.चेअरमन बाळासाहेब पांढरे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे सर्व संचालक शेतकी विभाग अधिकारी परिश्रम घेत असुन आपल्या मालकीच्या व हक्काच्या श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याला शेतकरी सभासद यांनी ऊस घालून गाळपाचे उद्दीष्ठ पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय प्रिन्स बागल यांनी केले आहे*
