आरोग्यकृषी

कोळगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पर्यायी जमिनी बाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक…

करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती प्रतिनिधी,
करमाळा तालुक्यातील सीना कोळगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात ७३२ शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देणे/मोबदला देणे हे काम अद्याप अपूर्ण आहे. या संदर्भात आपण यापूर्वीही पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू होते ,परंतु त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या मुळे सदर काम अद्याप प्रलंबित आहे.
या विषयी आपण 29 एप्रिल 2022 रोजी याविषयी बैठक घेण्याचे मा. जिल्हाधिकारी यांना सूचित केले होते. त्यानुसार दिनांक 9 मे 2022 रोजी दुपारी 4 वाजता सदर बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी माढा, विभाग कुर्डूवाडी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) सोलापूर, तहसीलदार करमाळा, कार्यकारी अभियंता सिना कोळेगाव प्रकल्प परांडा ,उस्मानाबाद हे उपस्थित राहणार आहेत.

चौकट …
असमन्वयामुळे धरणग्रस्त लाभापासून वंचित – सतीश निळ ( अध्यक्ष कोळगाव धरणग्रस्त संघटना )
आधी पुनर्वसन मगच धरण असे शासकीय धोरण असतानाही तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी व विशेष भूसंपादन अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने व त्यांच्या तांत्रिक चुकीमुळे कोळगाव प्रकल्पांतर्गत 732 लाभार्थी अद्याप पर्यायी जमिनीपासून / मोबदला मिळण्यापासून वंचित आहेत.
याविषयी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आपण पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या विषयावरती चर्चा झाली परंतु ठोस कृती झाली नाही. याच प्रलंबित विषयासंदर्भात सोमवार दिनांक 9/ 5/ 2022 रोजी बैठक होत आहे ही समाधानाची बाब आहे. या बैठकीत ठोस निर्णय व्हावेत व धरणग्रस्तांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group