संत शिरोमणी नामदेव शिंपी महाराज संजीवंन सोहळयानिम्मित हरिनाम सप्ताह विविध कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७२ व्या संजीवनी समाधी सोहळयानिमित्त हरीनाम सप्ताहाचे व विविध कार्यक्रमाच्ये आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक 20 ते 26 ॲागस्ट या कालावधीमध्ये कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन दररोज हरिपाठ व भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 26 जुलै रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त महाप्रसादाचे आयोजन खोलेश्वर मंदिरासमोर करण्यात आले असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाच्यावतीने संयोजकांनी केले आहे.
