आराध्यदैवत आई कमलाभवानी मातेचा नवरात्र उत्सवाची घटस्थापना करुन सुरुवात
करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मातेचा नवरात्र उत्सवाची सुरुवात आज सकाळी आठ वाजता मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांचे चिरंजीव बसवेश्वर चिवटे व त्यांच्या पत्नी या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत घटस्थापनेने झाली . यावेळी सर्व पंचायतन देवस्थान मध्ये घटस्थापना करण्यात आली सुशील पुराणिक रविराज पुराणिक यांनी पौराहित्य केले.यावेळी आई कमला भवानी मातेची पांढऱ्या रंगाचा भरदारी शालू दागिने आकर्षक हार व फुले घालून मंदिराचे पुजारी संदीप पुजारी( सर) यांनी पूजा मांडली. सनई चौघडे ,झांज, नगारा, संबळाच्या तालावर देवीची आरती झाली. यावेळी दादासाहेब पुजारी विजय पुजारी ओंकार पुजारी नारायण सोरटे रवींद्र सोरटे कमलाकर सोरटे तसेच सर्व मानकरी उपस्थित होते.
