Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाराजकीय

करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर यामध्ये कुठली गावे आहे ते बघा   

करमाळा. प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मुदत संपणाऱ्या 189 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे तर करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक -18 नोव्हेंबर 2022
नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीचा दिनांक सोमवार 28 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार 2 डिसेंबर 2022
अर्ज छाननी करण्याचा दिनांक : सोमवार 5 डिसेंबर 2022
नामनिर्देशक पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 7 डिसेंबर 2022 दुपारी 3 पर्यंत व त्याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्ह वाटप
आवश्यक असल्यास मतदान घेण्याचा दिनांक : 18 डिसेंम्बर 2022
मतमोजणी दिनांक : 20 डिसेंबर 2022

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group