प्रेस कामगार ते सानिका प्रेसचे मालक संतोष शिंगटे
प्रेस कामगार ते सानिका प्रेसचे मालक संतोष शिंगटे संतोष शिंगटे याचा जन्म सर्वसामान्य मध्यमवर्गिय कुटुंबात झाला. वडीलांचे निधन झाल्यामुळे आईवर संपुर्ण कुटुंबाचा भार पडल्याने घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांचे शिक्षण बारावीपर्यतंच झाले. शिक्षणानंतर उपजिविकेसाठी काय करायचे हा प्रश्न समोर उभा राहिल्यानंतर प्रिंटिंग व्यवसायाची विशेष आवड असल्याने बाईंडर म्हणून सुयोग ऑफसेट येथे काम सुरुवात केली बायडिंगचे काम शिकत असतानाही मशिन ॲापरेटरचे काम आत्मसात केले. ऑफसेट प्रिंटिंग मशीन ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्याचा अनुभव पाठीशी असल्याने दीप्ती ऑफसेट येथे ऑफसेट मशीन ऑपरेटर म्हणून काम केले. हे काम करत असतानाच त्यांचा विवाह वंदना यांच्याशी झाल्यानंतर काही दिवसातच संतोषचे नशीब पालटले व त्यांनी स्वतःच ऑफसेट मशीन विकत घेऊन त्यांनी सानिका प्रिंटर्स या नावाने स्वतःचे प्रिंटिंग प्रेस ऑफसेट प्रिंटिंग व्यवसाय सुरू केला. प्रामाणिक सचोटी पूर्ण सेवा देऊन सानिका प्रिंटर्स यांनी अल्पावधीतच करमाळा शहर व तालुक्यात नावलौकि मिळवला आहे. आजच्या युवकांना त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे जीवनामध्ये किती प्रतिकूल परिस्थिती असली तरी संघर्षातून यश मिळू शकते त्याला परिस्थिती आडवी येऊ शकत नाही याचे संतोष शिंगटे यांचे उत्तम उदाहरण असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुठलाही वारसा नसताना केवळ जिद्द चिकाटी परिश्रम यांच्या जोरावर संतोष शिंगटे यांनी यश मिळवले आहे. त्यांच्या वाटचालीत त्यांची पत्नी वंदना आईचा मोलाचा वाटा आहे. सांसरिक जीवनातही सुखी संपन्न आयुष्य जगत असून असून मुलगी सानिका मुलगा सत्यम अशी दोन अपत्ये आहेत कुणाशीही स्पर्धा न करता माणुसकीचे प्रेमाचे नाते जपत या धकाधकीच्या युगात काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या संतोष शिंगटे यांचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांच्या भावी वाटचालीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा