करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत बागल पाटील गटाचे मनोमिलन बाजार समितीच्या मिंटीगमध्ये स्व.गोवींदबापु पाटील व रमणभाई दोशी यांना श्रंध्दाजली वाहून सभा तहकूब

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जेष्ठ नेते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी अध्यक्ष कर्मयोगी स्व.गोविंदबापु पाटील कृषी उत्पन्न बाजारसमितीचे माजी चेअरमन स्व. रमणलाल भाईचंद दोशी यांचे दुःखद निधन झाले असल्याने त्यांना श्रध्दांजली वाहुन शोकप्रस्ताव मांडल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची सभातहकूब करून आम्ही बाहेर पडलो आहोत. सभा तहकूब करण्याला विरोध करुन विरोधी संचालकांनी काम चालू ठेवण्याचा आग्रह धरणे म्हणजे या लोक नेत्यांचा अवमान केला असल्याचे कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी म्हटले आहे .सभेच्या सुरुवातीला सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी श्रंध्दाजलीचा शोकप्रस्ताव मांडला .या प्रस्तावाला संचालक दिग्विजय बागल यांनी अनुमोदन दिले असून श्रंध्दाजलीचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.या नेत्यांचा सन्मान म्हणुन सभा तहकूब करण्याचा ठराव आम्ही केला असुन या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर ,उपसभापती चिंतामणी दादा जगताप, बाजार समितीचे संचालक दिग्विजय बागल ,आनंदकुमार ढेरे ,रंगनाथ शिंदे, ,सरस्वती केकान, अमोल झाकणे, यांच्या एकुण नऊ संचालकांच्या
सदर निवेदनावर सह्या आहेत. सभा तहकूब करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला असल्याचे सचिव /सहाय्यक निबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .सध्याच्या परिस्थितीत कृषी उत्पन्न. बाजार समितीत बागल गट व नारायण पाटील गट पुन्हा यावेळी एकत्र आले असुन बागल गटाचे आठ व नारायण पाटील गटाचे दोन सदस्य आहेत. सध्याच्या परिस्थितीत बाजारसमितीवर बागल पाटील गटाचे बहुमत यानिमित्ताने सिध्द झाले आहे. सभेची सुचना शिवाजी बंडगर व अनुमोदन संचालक दिग्विजय बागल यांनी दिले.श्रंध्दाजलीचा ठराव पारित करून या नेत्यांचा सन्मान म्हणुन सभा तहकूब करण्यात आली आहे.त्यामुळे बहुमतशिवाय संख्येच्या अभावी त्यांनी नंतर घेतलेली सभा अथवा मिंटीग घेणे बेकायदेशीर आहे.आम्ही करत असलेल्या विकास कामांना विरोधक जाणीवपूर्वक विरोध करुन अडथळा आणण्याचे काम करत असल्याचे कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती प्रा . शिवाजीराव बंडगर यांनी सांगितले आहे.
