करमाळा

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा-राजाभाऊ कदम


करमाळा प्रतिनिधी : मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे मोर्चेकर्‍यांच्या मागण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करा,केळी रोपे कंपनीच्या किमतीपेक्षा दुप्पट तिप्पट किमतीने शेतकऱ्यांना विकणाऱ्या एजंट वरती कारवाई करून कंपनीच्या किमतीतच शेतकऱ्यांना रोपे मिळावीत,
पात्र केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून धान्य मिळाले पाहिजे, रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे नाव कमी करणे हे अर्ज एक वर्षापासून पुरवठा विभागात पडून आहेत ही कामे लवकरात लवकर करा,
संजय गांधी योजनेचे पैसे कित्येक लाभार्थ्यांना सहा महिन्यापासून मिळालेले नाहीत ते लवकरात लवकर मिळावेत नवीन संजय गांधी चे प्रकरण मंजूर होऊन तीन महिने झाले त्यांना अध्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळायला सुरू व्हावेत या सर्व मागण्या घेऊन बहुजन संघर्ष सेना मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा करमाळा येथून मोर्चाला सुरुवात करणार आहे तेव्हा सर्व नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!