Saturday, April 4, 2026
Latest:
करमाळा

वसंत महोत्सवात ‘जीवन गौरव पुरस्कार ’ व ‘करमाळा समाजभूषण’ पुरस्कारांसह वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा  प्रतिनिधी
करमाळा येथील यशकल्याणी संस्थेचे प्रेरणास्थान श्रद्धेय वसंतराव दिवेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतिवर्षी ‘वसंत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते.
यामध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धाचे पारितोषिक वितरण व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात येते.
या वर्षीचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात व दिमाखात पार पडला. समाजसेवा, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना गौरविण्यात आले.
अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त भारतराव शिंदे पाटील यांना सामाजिक व आध्यात्मिक सेवेसाठी आणि प्रा.डॉ. इंदिरा महेंद्र पाटील यांना शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी यशकल्याणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व प्रसिद्ध संशोधक डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या प्रसंगी डॉ. प्रचिती पुंडे, डॉ. महेंद्र पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला तर प्रसिद्ध व्यापारी राजकुमार दोशी, दिलीप तळेकर यांच्यासह कराडचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख, सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, यांचा करमाळा समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा उपक्रमांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या वेळी बोलताना डॉ. अरविंद देशमुख म्हणाले, “ प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी आणि ए पी जे व्हाव. शिक्षण आणि समाजसेवा या दोन गोष्टींनी समाजाचे खरे परिवर्तन साध्य होते. यशकल्याणी संस्थेचे कार्य समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आदर्श ठरत आहे.”संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील यांनी सांगितले की, “भारतराव शिंदे व डॉ. प्रा. इंदिरा महेंद्र पाटील यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे. हा सन्मान म्हणजे सेवाभाव आणि ज्ञानयज्ञाचा गौरव आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी उत्तमरीत्या केले, तर प्रा. कल्याणराव साळुंके यांनी आभार मानले.
समारंभानंतर उपस्थितांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन केले.या सोहळ्यामुळे करमाळा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ‘यशकल्याणी संस्था’ समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व्यक्तींचा सन्मान करून समाजजागृतीचे कार्य सतत करत आहेत 

यशकल्याणी जीवन गौरव पुरस्कार’ स्वीकारताना भारतराव शिंदे पाटील व प्रा. (डॉ.) इंदिरा पाटील. कार्यक्रमात डॉ. अरविंद देशमुख, प्रा. गणेश करे पाटील, डॉ. प्रचिती पुंडे, डॉ. महेंद्र पाटील, अमित देशमुख, प्रा. लावंड, राजकुमार दोशी, दिलीप तळेकर, अरविंद निलंगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!