Wednesday, May 13, 2026
Latest:
Uncategorized

करमाळा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे कॉटेज हॉस्पिटल येथे परिचारिका दिन साजरा

करमाळा प्रतिनिधी करमाळा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे कॉटेज हॉस्पिटल येथे परिचारिका दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षपदी वैद्यकीय अधीक्षक मा डॉ.वेदपाठक मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा डॉ डुकरे सर, मा. डॉ अभंग सर उपस्थित होते. ज्यांनी नर्सिंग या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली अशा फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस आहे. तो सर्व जगभर परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त करमाळा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन लेडीज विंग तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ सुनिता दोशी यांनी प्रास्ताविक केले . डॉ प्रीती शेटे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि परि चारिकांचे महत्व विशद केले. त्यानंतर प्रमुख परिचारिका विद्या ढाकणे आणि मेट्रन लोखंडे यांनी परिचरिकांना शपथ दिली. सर्व परिचरिकांचा करमाळा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन लेडीज विंगच्या सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ मंजिरी नेटके डॉ वैशाली घोलप डॉ उर्मिला जाधव डॉ सुजाता मेहता डॉ निशा सारंगकर डॉ वैशाली खोसे यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ.प्रिती शेटे यांनी आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!