Saturday, June 27, 2026
Latest:
करमाळा

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना करमाळा यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन*

करमाळा प्रतिनिधी पत्रकारांबाबत करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद व धमकीवजा वक्तव्याचा तीव्र निषेध करत अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, करमाळा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक मा. श्री रणजीत माने, करमाळा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले, यांच्यावतीने ए.पी. आय श्री.दिलीप ढेरे यांनी निवेदन स्वीकारले …
निवेदनाद्वारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या तसेच शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. पत्रकारांना धमकावणे, अपमानास्पद भाषा वापरणे किंवा त्यांच्या कार्यात अडथळा आणणे हे लोकशाही मूल्यांवर व प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात करणारे असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, राज्य महासचिव विकास भोसले तसेच जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून संबंधित खासदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संघटनेने संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, तसेच भविष्यात पत्रकारांना धमकावणे, अपमानित करणे किंवा त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर तालुका अध्यक्ष दिनेश मडके, उपाध्यक्ष सूर्यकांत होनप, संजय साखरे, सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, सहसचिव तुषार जाधव, तालुका संपर्क प्रमुख नंदकिशोर वलटे, प्रवक्ता नितीन झिंजाडे ,कार्यवाह रवींद्र विघ्ने, सहकार्यवाह आनंद माळी ,तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन चव्हाण, मार्गदर्शक सल्लागार नासीर कबीर, ॲड. बाबुराव हिरडे, अशोक नरसाळे, राजाराम माने यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष दिनेश मडके, सचिव नरेंद्रसिंह ठाकुर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमुखाने खासदार संजय दिना (काका) पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, सोलापूर, उपविभागीय अधिकारी, करमाळा तसेच तहसीलदार, करमाळा यांना माहितीस्तव पाठविण्यात येणार असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!