Thursday, August 20, 2026
Latest:
करमाळा

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सचिनभाऊ गायकवाड यांचा पुढाकार* *स्वखर्चातून बोअरवेल घेऊन नागरिकांना दिलासा; भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते शुभारंभ

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन नगरसेविका श्रीमती निर्मलाताई गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी श्री. सचिनभाऊ गायकवाड (मालक) यांनी चांदगुडे गल्ली येथे स्वखर्चातून बोअरवेल घेऊन लोकहिताचा आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते मा. दिग्विजय बागल यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रभागातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही शासकीय निधीची प्रतीक्षा न करता सचिनभाऊ गायकवाड यांनी स्वतःच्या खर्चातून बोअरवेल उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रभागातील नागरिकांना भविष्यात पाणीपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शुभारंभ समारंभाला प्रभागातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिग्विजय बागल यांच्या हस्ते सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सचिनभाऊ गायकवाड (मालक) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना युवा नेते दिग्विजय बागल यांनी पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर प्रत्यक्ष कृती करून नागरिकांना दिलासा देण्याचा सचिनभाऊ गायकवाड यांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी अशाच प्रकारे संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत, लोकहितासाठी स्वखर्चातून करण्यात आलेले कार्य हे समाजासमोर आदर्श निर्माण करणारे असल्याचे मत व्यक्त केले. प्रभागातील नागरिकांनीही सचिनभाऊ गायकवाड यांचे आभार मानत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या कार्यक्रमास करमाळा शहराचे उपनगराध्यक्ष अतुल भैय्या फंड, नगरसेवक प्रतिनिधी विजय घोलप, नगरसेवक प्रतिनिधी महादेव फंड, माजी नगरसेवक नारायणराव पवार, नगरसेवक सुनील बनसोडे, ॲड. अमर शिंगाडे, ज्योतीराम लावंड, नगरसेविका श्रीमती निर्मलाताई गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असून, सामाजिक बांधिलकी जपत विकासापेक्षा मूलभूत गरजांना प्राधान्य देणाऱ्या सचिनभाऊ गायकवाड यांच्या या उपक्रमाचे शहरभरातून स्वागत व कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!