Thursday, September 17, 2026
Latest:
Uncategorized

करमाळा आगार प्रमुखांची उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी घेतली भेट; नवीन एसटी मार्गाबाबत सकारात्मक चर्चा

करमाळा प्रतिनिधी करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी करमाळा एसटी आगार प्रमुखांची भेट घेऊन तालुक्यात नवीन एसटी बस मार्ग सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी करमाळा – जेऊर – कुंभेज फाटा – पोफळज – उमरड – मांजरगाव – उंदरगाव चौफुला – टापरे चौक – पारेवाडी – हिंगणी – गुलमरवाडी – पोमलवाडी – केत्तुर नं. २ – पारेवाडी – करमाळा अशी सकाळी व संध्याकाळी एसटी फेरी सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
हा मार्ग सुरू झाल्यास परिसरातील विद्यार्थी,शेतकरी, व्यापारी,महिला तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यासंदर्भात करमाळा पंचायत समितीने पारित केलेल्या ठरावाची प्रत व संबंधित माहितीही आगार प्रमुखांना सादर करण्यात आली.
करमाळा तालुक्यातील प्रवाशांना अधिक जलद,सुरक्षित व सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने भविष्यातही अशा नवीन मार्गांचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी सांगितले.
यावर आगार प्रमुखांनी मागणी सकारात्मक असून प्रवाशांच्या हिताचा विचार करून लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी करमाळा एसटी आगार प्रमुखांना नवीन बसमार्गाबाबत निवेदन सादर करताना उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने, केत्तुरचे सरपंच सचिन वेळेकर, ग्रा पं सदस्य हनुमंत गुलमर, ग्रामपंचायत अधिकारी गणेश पवळ व सहकारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!